नभ आज दारी आले

नभ आज दारी आले

वेड्या मनास कोण समजावी
उंच उडाले निळ्या आकाशी
सोडून मला एकटेच भरकटले
कदाचित मग थोडे घाबरले
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

सांगून ते एकते कोणाचे
विचार मांडते सतत स्वतःचे
कितीही त्यास जखडून ठेवा
पण ते पळते , हरवते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.

जाणत नाही जगाची रीत
मिसळून राहणे हीच प्रित
एकटेच ते गुंगते , रमते
आकाश दुलईत दडपुन जाते
परतिचि मनास वाट दाखवण्या
नभ आज माझ्या दारी आले.