शब्दांचे आंगण

शब्दांचे आंगण किती निराळे 
शब्दांचे जग एकदम वेगळे 

शब्दांच्या घरात मी पण रहाते 
शब्दान मधूनच आपल्या भावना पहाते 

शब्द  कधी असतात जुई सारखे नज़ूक 
शब्द कधी असतात दगडा सारखे कठोर 

शब्ध कधी होतात ओसाड  रान
शब्द कधी हिरवे,कधी पिवळे  पा

शब्द कधी हळूवार वाहणारा झरा 
शब्द कधी टप टप पावसाच्या गारा 

शब्द सुरांचे,सगळ्यांना हवेसे 
शब्द बोचरे ,एकने पण नकोसे 

शब्दांचा सुशोभित बाण,जपुन वापरावा 
शब्दाने घायाळ कोणी,निर्माण करतो दुरावा 

शब्द आपले दुसर्यांच्या हृदयात फुलावे 
शब्ढ साखर दुधात मिसळून बोलावे. 

तू येशील ना

तू येशील ना

अजूनही मी तुझी वाट पहाते,तू येशील ना

त्या रम्य स्वप्नात पुन्हा मला नेशील ना……………. 

 

प्रित ही आहे तुझी आणि माझी

जाई जुई च्या फुला सारखी नज़ूक

आपल्या प्रीतीचे गाणे आणि गोडवा

हृदयाच्या कोपर्‍यात मी ठेवलाय जपून

ते मोहावणारे सूर छेडण्या साठी परत

तू येशील ना….

 

आठवणीत आहेत अजुन तुझे बोलके डोळे

काहीही ना सांगता खूप काही सांगणारे

मन्त्रमुग्ध होऊन मला पाहणारे

मनातल्या मनात मला लाजवणारे 

आणि एका क्षणात मला हसवणारे

त्या नज़रेत पुन्हा मला सामावून घेण्यास 

तू येशील ना…….

 

प्रेमाच्या वेलिवर अजूनही फुले आहेत उमलेली

बिंदू सहित पाकली ना पाकली खुलेली

समीरा संगे अजूनही त्याचा सुगंध पसरतो

ओल्या चिंब भावना,त्यात सतत तो

आपल्या प्रेमाचे हे गुपित,सगळ्यांना सांगण्या साठी

तू येशील न….वाट  पहाते मी अजुन तुझी…….

top post

पाऊलवाटा

2007913111851360.jpg  

आठवनिंच्या  झोक्यावर  आज घेतला मी विसावा 
अजूनही शोधाते आहे प्रेमाचा तों हरवलेला ओलावा
आज मज पाशी आहेत अनेक नातिगोती
अजूनही जपून ठेवल्यात मी जुन्या चालीरीती 

अजूनही आहे माझा  गुलमोहर फुलेला
त्याचा सुगंध मनात खोलवर मुरलेला
मन् तरंगते त्या  निळ्या नदीच्या काठी 
जिथे कोणीही जीव लावे कोणा साठी 

आठवतों प्रेमाचा तों हिरवाकंच गालीचा विणलेला 
मुलायम रेशमी धाग्यानी प्रत्येक नात्यात गुंतलेला
एके दिवशी  मी परत तिथेच येइन 
प्रेमाची ती पालवी परत घेउन जाइन  

जीवनाच्या वाटेवर आज मी खुप पुढे आले 
आपल्या माणसात  असुनही परकी झाले
अजुन खुप चालायचे आहे निरोप घेते मी आता
पहायचे आहे कुठवर नेतात नशिबाच्या पाऊलवाटा 

top post